अंकुर रोपवाटीका
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मुंडवाडी येथे नयनरम्य भागात असलेल्या अंकुर रोपवाटीका ही उत्कृष्ट दर्जाच्या हिरव्या भाज्यांची रोपे लागवड करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सशक्त रोपे निर्मिती क्षेत्रात स्वतःचे नाव कमावण्यासाठी असंख्य खुणा निश्चित केल्या आहेत. आम्ही आपला शेती आणि बागकामाचा अनुभव उल्लेखनीय बनविण्यासाठी आमच्या स्तरावर सर्वोत्तम देण्यास वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांना प्रत्येक टप्प्यावर त्यांचा अभिप्राय निसंकोच पणे सांगण्यास प्रोत्साहित करतो जेणेकरुन आम्ही चांगल्या उत्पादनांसह आपणास सेवा देऊ शकू. आमच्या अनुभवी कार्यसंघाद्वारे आम्ही प्रत्येक हंगामात दर्जेदार उत्पादने सादर करण्यासाठी संशोधन व विकास मध्ये बराच वेळ आणि प्रयत्न खर्च करतो. जेणेकरून काळानुसार प्रगत होत जाणाऱ्या शेतकरी बांधवाना आम्ही नवीन तंत्रज्ञान, नवीन व्हरायटी, नवीन मार्केट मध्ये टिकण्यासाठीचं गणित मांडण्यास सर्वतोपरी मदत होईल.
आमची खास वैशिष्ट्ये
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केलेली रोपे
- विक्री पश्चात यशस्वी मार्गदर्शन
- सर्व भाजीपाल्यासह झेंडू, पपई, शेवंती, इ. रोपे उपलब्ध
- प्रत्येक ट्रे वर नर्सरीचे नाव, जात, लॉट नं. इ. माहिती
- सुरक्षित रोपे घरपोहोच करण्यासाठी ट्रान्सपोर्ट सुविधा
- नामांकित कंपन्यांच्या बियानांपासून रोपे तयार केली जातात
मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची विश्वासप्राप्त अंकुर रोपवाटीकेची रोपे आपल्या शेतापर्यंत उपलब्ध. कोकोपीट, व्हर्मिक्युलाइट व परलाईट वापरून रूट ट्रेनर ट्रे मध्ये ऑटो सोविंग मशीन च्या साहाय्याने तयार केलेले संपूर्ण सुरक्षीत, निरोगी, सशक्त सर्व भाजीपाला रोपे तसेच पपई, झेंडू, ऊस, शेवंती, शेवगा यांची रोपे मिळण्याचे एकमेव ठिकाण अंकुर रोपवाटीका...
प्रिय शेतकरी बांधवाना सप्रेम नमस्कार !
वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात,आता शेतकरी बांधवाना सुद्धा काळाप्रमाणे बदलावच लागेल. नवं तंत्रज्ञान, नवं मार्केट, नवीन व्हरायटीज याच बरोबर उत्पादन खर्च यांचं गणित नव्याने मांडावं लागेल. तेव्हा चांगले उत्पादन घ्यायचे असेल व अधिक नफा मिळवायचा असेल तर कमजोर रोपे घेऊन नाही चालणार. त्यासाठी सशक्त व निरोगी रोपांची लागवड करणे गरजेचे आहे.
आमच्या रोपवाटीकेतील खास उत्पादने
संपर्क
पत्ता:
मुंडवाडी, ता. कन्नड जि. औरंगाबाद
ई-मेल:
info@ankurropvatika.com
दूरध्वनी
7875934040, 7875934646