Follow Us :

रोपवाटिका क्षेत्रातील अग्रगण्य नाव "अंकुर रोपवाटिका"

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मुंडवाडी येथे नयनरम्य भागात असलेली "अंकुर रोपवाटीका" ही उत्कृष्ट दर्जाच्या हिरव्या भाज्यांची रोपे लागवड करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सशक्त रोपे निर्मिती क्षेत्रात स्वतःचे नाव कमावण्यासाठी असंख्य खुणा निश्चित केल्या आहेत. आम्ही आपला शेती आणि बागकामाचा अनुभव उल्लेखनीय बनविण्यासाठी आमच्या स्तरावर सर्वोत्तम देण्यास वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांना प्रत्येक टप्प्यावर त्यांचा अभिप्राय निसंकोच पणे सांगण्यास प्रोत्साहित करतो जेणेकरुन आम्ही चांगल्या उत्पादनांसह आपणास सेवा देऊ शकू. आमच्या अनुभवी कार्यसंघाद्वारे आम्ही प्रत्येक हंगामात दर्जेदार उत्पादने सादर करण्यासाठी संशोधन व विकास मध्ये बराच वेळ आणि प्रयत्न खर्च करतो. जेणेकरून काळानुसार प्रगत होत जाणाऱ्या शेतकरी बांधवाना आम्ही नवीन तंत्रज्ञान, नवीन व्हरायटी, नवीन मार्केट मध्ये टिकण्यासाठीचं गणित मांडण्यास सर्वतोपरी मदत होईल.

तेजराव बारगळ

आमची खास वैशिष्ट्ये

  • अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केलेली रोपे.
  • विक्री पश्चात यशस्वी मार्गदर्शन .
  • सर्व भाजीपाल्यासह झेंडू, पपई, शेवंती, इ. रोपे उपलब्ध .
  • प्रत्येक ट्रे वर नर्सरीचे नाव, जात, लॉट नं. इ. माहिती .
  • सुरक्षित रोपे घरपोहोच करण्यासाठी ट्रान्सपोर्ट सुविधा .
  • नामांकित कंपन्यांच्या बियानांपासून रोपे तयार केली जातात .

लाखो शेतकऱ्यांचा विश्वास!

मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची विश्वासप्राप्त अंकुर रोपवाटीकेची रोपे आपल्या शेतापर्यंत उपलब्ध. कोकोपीट, व्हर्मिक्युलाइट व परलाईट वापरून रूट ट्रेनर ट्रे मध्ये ऑटो सोविंग मशीन च्या साहाय्याने तयार केलेले संपूर्ण सुरक्षीत, निरोगी, सशक्त सर्व भाजीपाला रोपे तसेच पपई, झेंडू, ऊस, शेवंती, शेवगा यांची रोपे मिळण्याचे एकमेव ठिकाण अंकुर रोपवाटीका...

तेजराव बारगळ

तेजराव बारगळ

अंकुर रोपवाटिका-भाजीपाला रोपवाटीकेतील विश्वसनीय नाव

अंकुर रोपवाटिका: कृषी क्षेत्रातील एक प्रेरणादायी प्रवास.

औरंगाबाद जिल्ह्यातील भाजीपाला पिकांचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा कन्नड तालुका हा कृषी समृद्धीचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. या तालुक्याचे हेच शक्तिस्थान ओळखून, अंकुर रोपवाटिकेसारखा भव्य आणि अत्याधुनिक प्रकल्प मुंडवाडी येथे उभारणारे श्री. तेजराव पंढरीनाथ बारगळ हे कृषी क्षेत्रात एक नवा प्रवाह निर्माण करणारे आणि अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले आहेत.

श्री. बारगळ यांनी केवळ एका रोपवाटिकेची स्थापना केली नाही, तर त्यांनी एक कृषी क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. पश्चिम महाराष्ट्रातील रोपवाटिकांचे आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत पद्धती मराठवाड्यात आणून त्याचा वटवृक्ष करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक परिश्रमामुळे, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाची, निरोगी आणि उत्पादनक्षम रोपे स्थानिक पातळीवर उपलब्ध झाली आहेत, ज्यामुळे त्यांची शेती अधिक किफायतशीर बनण्यास मदत झाली आहे.

महाराष्ट्राची विश्वासार्ह निवड:अंकुर रोपवाटिका

अंकुर रोपवाटिका ही आज केवळ कन्नड तालुक्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिने आपले कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही विस्तारले आहे. अंकुर रोपवाटिकेची जोमदार आणि सशक्त रोपे शेतकरी बांधवांच्या विश्वासाचे प्रतीक बनली आहेत. प्रत्येक हंगामात दर्जेदार रोपे पुरवून, आधुनिक शेतीला चालना देण्याचे त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, अंकुर रोपवाटिका कृषी विकासासाठी कटिबद्ध असून, शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे.

उत्कृष्ट यश

पॉलीहाऊस आणि आधुनिक यांत्रिकीकरण वापरून उच्च प्रतीची रोपे.

समर्पित टीम

70-80 मजूर आणि तज्ज्ञ कार्यरत आहेत.

आमचा प्रवास

2010 मध्ये तेजराव बारगळ यांनी टोमॅटोची रोपे स्वतःच्या देखरेखीखाली तयार करणे सुरू केले. त्यानंतर 2011 पासून व्यावसायिक रोपवाटिकेची सुरुवात झाली आणि औरंगाबाद, जालना, मराठवाडा येथील हजारो शेतकऱ्यांचा विश्वास मिळवला. सुरुवातीला 68,000 रोपांचा पुरवठा करणाऱ्या अंकुर रोपवाटिकेने आता दरवर्षी 5-6 कोटी रोपे उपलब्ध करून दिली आहेत.

Journey Illustration

2016 मध्ये इटलीमधून 20 लाख रुपयांचे स्वयंचलीत बियाणे टोकण यंत्र विकत घेऊन रोप उत्पादन प्रक्रियेत सुधारणा केली. आज आमच्याकडे 9 एकर शेडनेट आणि पॉलीहाऊस आहे, जिथे अत्याधुनिक तंत्राचा वापर करून उत्तम दर्जाची रोपे तयार केली जातात.

Journey Illustration

२०१1–२०१५ – शेतकऱ्यांचा वाढता विश्वास आणि उत्पादन वाढ या काळात हजारो शेतकऱ्यांनी अंकुर रोपवाटिकेवर विश्वास दाखवला. सुरुवातीला फक्त ६८,००० रोपे पुरवली जात होती शेतकऱ्यांचा प्रतिसाद आणि समाधान पाहता मागणी झपाट्याने वाढत गेली.

Journey Illustration

२०१६–२०२५ – उत्पादनात मोठी वाढ – ६८,००० रोपांपासून वाढ होऊन दरवर्षी ५–६ कोटी रोपांचे उत्पादन – अंकुर रोपवाटिका महाराष्ट्रातील भाजीपाला रोप उत्पादनातील एक विश्वासार्ह नाव ठरले.

Journey Illustration

आज ९ एकर आधुनिक तंत्रसज्ज पायाभूत सुविधा – रोपवाटिकेचे विस्तारलेले क्षेत्रफळ: ९ एकर – संरचना:शेडनेट हाऊस,पॉलीहाऊस – वापरले जाणारे तंत्र:तापमान व आद्रतेवर नियंत्रण ठेवणारी अत्याधुनिक पद्धती नियंत्रित वातावरणात रोप उत्पादन.

शेतकऱ्यांसाठी सेवा

  • फोन बुकिंग सुविधा - घरबसल्या रोपे बुक करण्याची सोय.
  • घरपोच रोपे - शेतकऱ्यांच्या सोयीसाठी थेट वितरण.
  • उच्च दर्जाची बियाणे - नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार बियाण्यांपासून रोप निर्मिती.
  • लागवडोत्तर मार्गदर्शन - रोपे लागवल्यानंतर शेतकऱ्यांना सल्ला व मार्गदर्शन.

भविष्यातील दृष्टीकोन

आम्ही शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी रोप निर्मितीत आणखी नाविन्यपूर्ण प्रयोग* करत आहोत. आमच्या संशोधन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने, अधिक उत्पादनक्षम आणि सेंद्रिय शेतीस उपयुक्त रोपे निर्माण करण्याचा आमचा मानस आहे.

Seedling Image
Farmers Image
Nursery Image
Mechanization Image
Trust Image

शेतकऱ्यांच्या विश्वासाचा रोपवाटिका प्रवास

  • १२ वर्षांपासून भाजीपाला रोपांच्या क्षेत्रात अविरत सेवा.
  • संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेली राज्यातील सर्वात मोठ्या रोपवाटिकेपैकी एक.
  • संस्थेचे चेअरमन श्री तेजराव बारगळ यांच्या अथक प्रयत्नातून संस्थेला शास्त्र शुद्धतेची आणि यांत्रिकीकरणाची जोड मिळाली.
  • दरवर्षी ६ ते ७ कोटी रोपांची निर्मिती.
  • सुमारे १० हजार आणि त्याही पेक्षा जास्त शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्काची यंत्रणा कार्यरत.

60000000

रोपांचा पुरवठा

10000

संतुष्ट शेतकरी

150

समर्पित कर्मचारी

14

वर्षांचा अनुभव
WhatsApp Instagram Facebook YouTube